आम्ही अर्ध्या पगारावर काम करतो, पण जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा; कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चा

आम्ही अर्ध्या पगारावर काम करतो, पण जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा; कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चा

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर,सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी (old pension scheme) संप पुकारल्याने विरोधातील आणि समर्थनातील प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियात सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संपाची जाहीरपणे खिल्ली उडवली जात असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, कोल्हापुरात (Kolahpur News) सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगारांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेली नाही

जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा! आम्ही तयार आहोत. अर्ध्या पगारावर काम करायला.. ते ही विना पेन्शन... सुशिक्षित बेरोजगारांचा युवक युवतींचा भव्य मोर्चा. जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण मोर्चात सहभागी होऊया. उद्या (17 मार्च) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासाठी दसरा चौकात हजर राहावे, असेही आवाहन यामधून करण्यात आले आहे. मी येतोय, तुम्हीही या.. यायला लागतंय