HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संघटन पर्व अंतर्गत भाजपाच्या संघटनात्मक निवडणूक प्रकियेला प्रारंभ

संघटन पर्व अंतर्गत भाजपाच्या संघटनात्मक निवडणूक प्रकियेला प्रारंभ

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात संघटन पर्व अभियान सुरू असून भाजपा प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. 

या नोंदणीच्या आधारेच पक्षाचा बूथ अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष अशी निवड प्रक्रिया राबविण्यात येते. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे यामध्ये सक्रिय सदस्यता नोंदणी 15 मार्च, सक्रिय सदस्यता पडताळणी समिती 20 मार्च, बूथ अध्यक्ष आणि बूथ समिती सदस्यांची निवड 10 मार्च ते 20 मार्च, मंडल अध्यक्ष आणि मंडल समिती सदस्यांची निवड 20 मार्च ते 30 मार्च या कालावधीत पूर्ण करायची आहे. याविषयात आज भाजपा जिल्हा कार्यालयात भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या महानगर, पूर्व, पश्चिम जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी याविषात उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर जिल्हा निवडणूक प्रभारी भरत पाटील सातारा, पश्चिम जिल्हा निवडणूक प्रमुख सुरेशराव हाळवणकर, पर्व जिल्हा निवडणूक प्रमुख योगेश टिळेकर हे काम पाहणार आहेत. विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथ मध्ये तीन सक्रिय सदस्यांची नोंदणी करणे अनिवार्य असून शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्षांच्या नियुक्त्या करून बूथ समिती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ही प्रक्रिया पूर्ण करत असताना मंडल निवडणूक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंडल आणि बूथ स्तरावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यायचा असून जिल्हा आणि प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसारच नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक–निंबाळकर, प्रदेश सचिव महेश जाधव, माजी आमदार प्रकाश आवाडे, राहूल चिकोडे, डॉ राजवर्धन, गायत्री राऊत, अशोक देसाई, शिवाजी बुवा, डॉ. आनंद गुरव, शहाजी भोसले, प्रमोद कांबळे यांच्यासह भाजपा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.