संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये "सीएनसी प्रशिक्षण" कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत "सीएनसी" विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षक अभिजीत चौगुले, सुशांत मिसाळ, प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. महेश काळे, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. योगेश पोवार आणि विद्यार्थी उपस्थित होते.
संजय घोडावत इन्स्टिट्यूट डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल विभाग आणि स्टार इन्फोटेक इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करून 92 लाभार्थी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अवांतर कौशल्य प्रमाणपत्र रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यास वेळोवेळी महत्त्वाची मदत करत असता. जे विद्यार्थी शिक्षणाबरोबर इतर कौशल्य आत्मसात करतात त्या विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये एक विशिष्ट वाढ झालेली असते. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रशिक्षण कार्यास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.