संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. नितीन जाधव यांना "नॅशनल एज्युकेशन गोल्ड स्टार पुरस्कार"

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. नितीन जाधव यांना "नॅशनल एज्युकेशन गोल्ड स्टार पुरस्कार"

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिटयूटचे मुख्य प्रवेश समन्वयक आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रा. नितीन जाधव यांना आधार सोशल फौंडेशन, बेळगावतर्फे २०२५ चा "नॅशनल एज्युकेशन गोल्ड स्टार पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच महापुर आणि कोरोना काळात सामाजिक कार्य केले आहे.

प्रा. जाधव यांनी एम. टेक आणि एमबीए शिक्षण घेतले असून, त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध झाली असून, भारत सरकारकडे त्यांचे दोन पेटंट्सही प्रकाशित झाले आहेत.

या सन्मानाबद्दल प्रा. जाधव म्हणाले, "शिक्षण हे सर्वश्रेष्ठ आहे, आणि हा पुरस्कार माझी जबाबदारी वाढवतो." संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले आणि डायरेक्टर डॉ. विराट गिरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.