कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
पत्रकार- सुभाष भोसले
कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा . अभिजित दुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.यावेळी नवीन शैक्षणिक धोरणाचे ज्युनिअर कॉलेज वरती होणारे परिणाम या विषयावर प्राध्यापक डॉक्टर बी.एम. हिरडेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते डॉक्टर हिरडेकर यांनी अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण अशा पद्धतीची माहिती देऊन सर्वच कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचे प्रबोधन केले. यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी संघटनेला शुभेच्छा दिल्या त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली रोपट्यास पाणी घालून सभेची सुरुवात झाली. सहसचिव प्रा. बी.के. मडिवाळ यांचे प्रास्ताविक झाले .त्यानंतर जिल्हा सचिव प्रा. संजय मोरे यांनी सभेच्या नोटीसचे वाचन केले त्यानंतर सभेचे विषय सभे पुढे ठेवले .ते सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले सगळे पुढील विषय पुढील प्रमाणे १) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे २) सेवानिवृत्त व गुणवंत शिक्षकांचा संघटनेच्या वतीने सत्कार करणे ३) सन 2021- 22 व 2022 -23 या वर्षीचा जमा खर्च सादर करणे ४) संघटनेच्या कार्याचा आढावा घेणे ५) संघटनेची वार्षिक वर्गणी जमा करणे बाबत निर्णय घेणे ६)विविध समित्यांचे गठन करणे ७) परीक्षा विभागाचे काम कोल्हापुरातून सुरू करणे ८) आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करणे . सन 2021 -22 व 22- 23 चा जमा खर्च कोषाध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे यांनी सादर केला सन्माननीय सदस्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे जिल्हा सचिव प्रा. संजय मोरे यांनी दिली तसेच संघटनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला संघटनेची भविष्यातील वाटचाल काय असेल याबद्दलचे विवेचन केले तसेच ही संघटना फक्त आणि फक्त ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या मालकीची आहे याबाबत जिल्हा कार्यकारणीची ठोस भूमिका मांडली .अनेक सन्माननीय सदस्यांनी आपापले विचार मांडून संघटनेला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला .यापुढे कायम संघटनेसोबत राहून येणाऱ्या काळात आणि जिल्ह्यातील सी.एच.बी शिक्षकापासून ते विना अनुदानित शिक्षकापर्यंतचे सर्वांचे प्रश्न सोडवण्याचे ठरले. संघटनेच्या वतीने विधायक काम करून महाराष्ट्र राज्या समोर संघटनेचा आदर्श निर्माण करण्याचे ठरले. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. कल्याणराव पुजारी सर, प्रा. अशोकराव पाटील , डॉ.रवींद्र पोर्लेकर प्रा. टी. के सरगर प्रा. ए.बी.मगदूम यांची सल्लागार म्हणून निवड केली तसेच अनेक समित्यांमध्ये परीक्षा समिती, आयटी सेल ,शिक्षक प्रशिक्षण समिती इत्यादी समित्या गठीत करण्याबाबत निर्णय घेतला. सदर सभेसाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून अनेक शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होत्या .शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रा. अभिजित दुर्गी यांनी संघटनेचे