शिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती

कोल्हापूर प्रतिनिधी : मराठी पत्रकारितेचे आद्य संपादक ‘दर्पण’ कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. निशा-मुडे पवार, डॉ. शिवाजी जाधव, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चव्हाण, उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, सुधाकर बर्गे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.