जिल्ह्यात ' या 'साठी मनाई आदेश जारी

जिल्ह्यात ' या 'साठी मनाई आदेश जारी

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम १५ ऑक्टोबर २०२४ पासून जाहिर झाला असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्हयामध्ये १० विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू केलेली आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून मतमोजणीची प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी  क्र. जिवीशा/BNNS कलम १६३ आदेश/५४१३/२०२४, अहवालान्वये निदर्शनास आणून दिले असल्याने  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी  कोल्हापूर जिल्ह्यात विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्याचा मनाई आदेश जरी केला आहे. 

मनाई आदेशात काय आहे ?

१) विजयी उमेदवाराची विजयी मिरवणुक काढणे २) विजयी उमेदवाराच्या कार्यकर्ते / कोणत्याही व्यक्ती/राजकिय पक्ष/संस्था यांनी गावातून / शहरातून मिरवणूक / रॅली काढणे ३) सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे ४) फटाके लावणे/फोडणे याला आदेशाप्रमाणे मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश  २३ नोव्हेंबर  रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी लागू राहणार असून आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या  कलम १६३ (१) अन्वये तातडीचा  प्रसंग म्हणून पारित करण्यात आला आहे.