सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात 9 कोटींची उलाढाल

सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात 9 कोटींची उलाढाल

कोल्हापूर प्रतिनिधी : भला मोठा कोबी, चिंचवाड शिरोळ येथील नागेंद्र घाटगे यांचा लाल कोबी,नांदणी शिरोळ येथील गेट्स फुल राशिवडे येथील जरबेरा फुले निशिगंध,बेले येथील ९७८ वान असलेला दोडका प्रदर्शनाचे ठरले.विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला, चेरी टोमॅटो सुळकुड येथील एक किलोचे भरताचे वांगे बारवेक काळी वांगी,गडहिंग्लज येथील आनंदा कानडे यांची कलर कॅप्सिकम रंगीत ढबु मिरची खास आकर्षण ठरले हे सर्व पाहण्यासाठी तपोवन मैदानावर तुफान गर्दी केली होती. शिवाय याठिकाणी मोठ्या प्रमाणात मसाले, जाम, उडीद नाचणी, हळद, विविध प्रकारचा तांदूळ, शेतीविषयक साहित्य बी बियाणे यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली शिवाय शेतकऱ्यांसह अबाल वृद्धांनी अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला.

समारोप प्रसंगी प्रकल्प संचालक जालिंदर पांगीरे, आत्मा प्रमुख रक्षा शिंदे पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद प्रमोद बाबर, गोकुळ संचालक बाबासो चौगुले, सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील, शेतकरी नेतृत्व बाबासाहेब देवकर, कृषी विकास केंद्र समन्वयक जयवंत जगताप,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुयोग वाडकर, डॉ,सुनील काटकर, बिद्री कारखाना संचालक आर.एस.कांबळे,कृषी प्रदर्शन संयोजक विनोद पाटील, सहयोगी संशोधन संचालक (एनएआरपी).डॉ.अशोक पिसाळ आदींच्या उपस्थितीत हस्ते विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला