अपघातातील मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना विमा धनादेशांचे वाटप

अपघातातील मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना विमा धनादेशांचे वाटप

 कागल : अपघातात मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना विमा धनादेशांचे वितरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते  करण्यात आले. जिल्हा बँकेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी अपघाती विमा सुरक्षा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाखांचा अपघाती विमा मंजुरीपत्र हळदवडे (ता. कागल)  येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेचे सभासद शेतकरी कै. नामदेव भिवा भराडे यांचे वारस धनंजय नामदेव भराडे व निढोरी येथील भैरवनाथ विकास सेवा संस्थेचे सभासद शेतकरी कै. दिलीप महादेव पाटील यांचे वारस तुषार दिलीप पाटील यांना धनादेश देण्यात आले. 

       यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, एस. बी. निंबाळकर, निढोरीचे माजी सरपंच अमित पाटील, अशोक परसू पाटील, सुरज लोहार, नारायण आंगज, संजय भराडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

          ......................

कागल: जिल्हा बँकेच्यावतीने सुरू असलेल्या शेतकरी अपघात विमा सुरक्षा योजनेचे धनादेश मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना देताना बँकेचे अध्यक्ष,  वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने व इतर प्रमुख.