HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सत्तालोभी लोकांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडत नाही- जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

सत्तालोभी लोकांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडत नाही- जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीण पश्चिम पदाधिकारी कार्यकारणी बैठक आज भाजपा जिल्हा कार्यालयात संपन्न झाली.

सर्वप्रथम नूतन जिल्हाध्यक्ष नाथजी पाटील यांचा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नूतन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी नेहमीच कार्यकर्ता आणि मजबूत संघटनात्मक बांधणीवर अग्रेसर राहिलेली जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली राजकीय पार्टी आहे. सत्तेच्या प्रवाहात असताना अनेक जण आले आणि निघूनही गेले परंतु जे कधी भारतीय जनता पार्टीचे झालेच नाही,ज्यांना कधी संघटना समजलीच नाही अशा सत्ता लोभी व्यक्तींच्या येण्याने अथवा जाण्याने भाजपला कोणताही फरक पडणार नाही.

            पाटील पुढे म्हणाले "कार्यकर्ता कर्ताधर्ता" या सूत्रावर कार्यरत राहणाऱ्या अनेक निष्ठावंत शिलेदारांनी केवळ 2 खासदारांपासून केलेली सुरवात ते आजपर्यंत जगातील सर्वात शक्तीशाली पक्ष इथपर्यंत आणून पोचविली आहे. असे कोणीही अन्य पक्षाचे नसताना 2014 साली भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रावर आली त्याचे कारण म्हणजे संघटनेवर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते होय. त्यामुळे निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात आल्या शिवाय राहणार नाही . 

याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तालुका, बूथ स्तरावर एकदिलाने भाजपाचे संघटनात्मक कार्य जोमाने करणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्षांना दिला.

     यावेळी भारतीय जनता पार्टी च्या सदस्यता अभियाना चा शुभारंभ यावेळी विभाग संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचे हस्ते करण्यात आला .याप्रसंगी विभाग संघटनमंत्री मकरंदजी देशपांडे, यांनी संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव बुवा 'जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव हंबीरराव पाटील,राजेंद्र तारळे ,वसंतराव प्रभावळे प्रा .राजेंद्र ठाकूर , प्रा. धनाजी मोरस्कर, संतोष तेली, प्रीतम कापसे कापसे (गडहिंग्लज )अनिरुद्ध केसरकर (आजरा )विलास रणदिवे (राधानगरी ) दत्तात्रय मेडशिंगे ( करवीर ) स्वप्निल शिंदे ( गगनबावडा ) मंदार परितकर ( पन्हाळा ) अनिल पंढरे ( दक्षिण करवीर ) डॉ.अजय चौगले,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अनिताताई चौगले प्रा धनाजी मोरस्कर आदींसह नेतेमंडळी,कार्यकर्ते उपस्थित होते.

    प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर आनंद गुरव यांनी केले तर आभार सरचिटणीस सुशीला पाटील यांनी मांडले .

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.