सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : बीड स्थानिक गुन्हे शाखेने केली विष्णू चाटेला अटक
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केली आहे.स्थानिक गुन्हे ही शाखेने कारवाई केली आहे. या हत्या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना या आधीच अटक करण्यात आली आहे. आता विष्णू चाटे याला अटक केल्यानंतर आरोपींची संख्या 4 झाली आहे. अद्यापही तीन आरोपी फरार आहेत.
संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास सीआयडीसह स्थानिक पोलिसांकडूनही करण्यात येत आहे. आता या प्रकरणातील विष्णू चाटे याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. विष्णू साठे याला न्यायालयासमोर हजर केले जाणार असून ही हत्या का करण्यात आली याचं कारण देखील समोर येऊ शकते.