सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंतापदी तुषार बुरूड
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंतापदी तुषार बुरूड यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शुक्रवारी कार्यभार मावळते अधीक्षक अभियंता शाम कुंभार यांची पोलिस गृहनिर्माण कल्याण महामंडळ मुंबई येथे बदली झाल्याने त्या जागी बुरूड यांची नियुक्ती झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांची कोल्हापूर महानगरपालिकेत बदली झाली आहे. त्यांच्याजागी नांदेड येथून रोहित तोंदले यांची नियुक्ती झाली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिणचे कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव यांची रत्नागिरी येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी रत्नागिरी येथून बी. एल. हजारे यांची नियुक्ती झाली आहे. तोंदले आणि हजारे यांनी पदभार स्वीकारला आहे.
अधीक्षक अभियंता बुरूड यांनी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि सार्वजनिक बांधकाम दक्षिण या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून सेवा बजावली असून, आता अधीक्षक अभियंता म्हणून ठाणे येथून कोल्हापूर येथे बदली झाली आहे.