सातार्डे येथे स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सातार्डे ता. पन्हाळा येथे देशाचा स्वातंत्र्य दिन रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला . शिवराय हायस्कुल सातार्डे चे ध्वजारोहन जगदंब दुध संस्थेचे चेअरमन व जगदंब प्रतिष्ठान चे संस्थापक प्रदीप पांडूरंग हांडे यांचे हस्ते झाले . यावेळी संस्थापक भिवाजी गणपती पोवार,अध्यक्ष सदाशिव गणपती पोवार, मुख्याध्यापक एस एस पाटील, मधुकर सखाराम पोवार, संचालक कृष्णात मधुकर पोवार, संचालक निलेश शिवाजी पोवार, नामदेव रामाणे, संदीप रामाणे, विद्या मंदिर सातार्डे व शिवराय हायस्कूल सातार्डे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच स्वातंत्र्यदिन व कृष्णात जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 50 लोकांनी रक्तदान केले . शिबीराचे उदघाटन हर्षल सुर्वे यांचे हस्ते झाले . रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व गिप्ट भेट देण्यात आले . यावेळी प्रमोद नाईक, विक्रम जगताप, प्रशांत जगताप, वैभव हांडे, तेजस जगताप, सदाशिव हांडे, किरण पोवार, संदिप रामाणे, विशाल रामाणे आकाश रामाणे व ग्रामस्थ उपस्थित होते .