कोल्हापूर, ताराबाई पार्क येथील "Dmart "मधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस

कोल्हापूर, ताराबाई पार्क येथील "Dmart "मधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस

कोल्हापूर प्रतिनिधी :-

डी मार्ट मध्ये बुरशीजन्य व मुदतीचा उल्लेख नसलेले बिस्कीट विक्री करण्यात आले. या बुरशी असलेली बिस्किटे खाऊन मुलांना उटल्या होऊ लागल्या. दवाखान्यात उपचारासाठी नेल्यानंतर विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. ही बिस्कीटे खाऊन एकूण सात मुलांना विषबाधा झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या गंभीर प्रकारबाबत शहर अध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी ताराबाई पार्क येथील डी मार्ट वर धडक मारत मनसे स्टाईलने तेथील व्यवस्थापन कमिटीला जाब विचारला. यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांनी तात्काळ  डी मार्ट मधील गोडाऊन सील करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली... 

 व्यवस्थापनाला धारेवर धरत राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील, राजू पाटील, यतीन होरणे, अभिजित पाटील, अजिंक्य शिंदे यांच्या सह अन्य कार्यकर्त्यांनी डी मार्ट मधून खरेदी केलेल्या लूज वस्तूंच्या वजनात 300 ग्रॅमचा फरक पडत असल्याचा आरोप केला. त्यामुळे विषबाधा झालेल्या मुलांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल ही  राजू दिंडोर्ले यांनी उपस्थित केला. यांचबरोबर समस्त कोल्हापुरातील नागरिकांनी डी मार्ट वर बहिष्कार टाकावा असेल आवाहन त्यांनी केले. या संदर्भात पोलिसांना पाचरण देत डी मार्ट वर फौजदारी गुन्हे दाखल करू असा इशारादेखील करण्यात आला.