अकराव्या वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत राष्ट्रीय नेमबाज पृथ्वीराज महाडिक यांनी घेतला ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य आणि डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्णवेध
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मध्यप्रदेशातील भोपाळ येथे नुकतीच अकरावी वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चार राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. सिनिअर गेम्स विभागात कोल्हापूरचे राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज महाडिक यांनी ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
अकराव्या वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप शॉर्टगन स्पर्धेचे, यंदा भोपाळ इथल्या एमपी स्टेट शुटींग ऍकॅडमीत आयोजन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा या चार राज्यातील नेमबाजांचा सहभाग होता. महाराष्ट्राकडून पृथ्वीराज महाडिक यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सिनिअर गेम्स विभागात पृथ्वीराज महाडिक यांनी ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. तर डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं. या कामगिरीमुळं त्यांची जानेवारी महिन्यात दिल्लीत होणार्या राष्ट्रीय शॉर्टगन स्पर्धेसाठी निवड झालीय. त्या स्पर्धेसाठी महासंघाचे पृथ्वीराज महाडिक नेतृत्व करतील. त्यांना प्रशिक्षक सिध्दार्थ पवार, तेजस कुसाळे यांचं मार्गदर्शन मिळाले. तर खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे पाठबळ लाभले.