अपघाती मृत्यू झालेल्या कागल तालुक्यातील चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप....
गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अर्थसहाय्य.... ...*
कागल प्रतिनिधी - सुभाष भोसले
अपघाती मृत्यू झालेल्या कागल तालुक्यातील चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण झाले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजनेतून हे अर्थसहाय्य देण्यात आले. मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाखाप्रमाणे एकूण आठ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.
यावेळी अपघाती मृत्यू झालेले शेतकरी कै. सूर्यकांत विनायक पडवळे यांचा मुलगा विनायक दत्तू पडवळे- रा. हळदी, कै. अशोक शंकर अर्जुने यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी अशोक अर्जुने - रा. मूरगूड, कै. तुकाराम दत्तात्रय शेटके यांच्या पत्नी श्रीमती आनंदी तुकाराम शेटके -रा. करंजीवणे, कै. विठू बापू चिंदगे यांच्या पत्नी श्रीमती कविता विठू चिंदगे - रा. सावर्डे बुद्रुक या वारसदारांना प्रत्येकी दोन लाखाप्रमाणे आठ रुपयांचे चेक वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, सांख्यिकी पर्यवेक्षक सुभाष मगदूम, मूरगूड विभागाचे कृषी सहाय्यक पिंटू ढोले, हळदीचे कृषी सहायक संगीता शिंदे, सावर्डे बुद्रुकचे कृषी सहाय्यक अविनाश पोवार, अर्जुनीचे कृषी सहाय्यक रोहीत मोरे, कृषी पर्यवेक्षक अमोल कांबळे, कृषी सहाय्यक संदीप कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
अपघाती मृत्यू झालेल्या कागल तालुक्यातील चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाखाप्रमाणे धनादेशांचे वाटप झाले. यावेळी कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते