अभिनंदन स्वप्नील! कोल्हापूरकरांसाठी आनंदाचा क्षण-आम.ऋतुराज पाटील

अभिनंदन स्वप्नील! कोल्हापूरकरांसाठी आनंदाचा क्षण-आम.ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधि) : पॅरिस ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळवून कोल्हापूरचे नाव जागतिक पातळी झळकवणाऱ्या स्वप्नील कुसाळे याला आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. स्वप्निलची ही कामगिरी समस्त कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

 पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळे यांने 50 मीटर एअर रायफल ३ पोझिशन या प्रकारात तृतीय स्थान मिळत कास्यपदक जिंकले. स्वप्नीलले मिळवलेल्या या यशामुळे कोल्हापूरच्या क्रीडा नगरीचा नावलौकिक अधिकच ठळक झाला आहे. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कुस्तीमधील कांस्य पदक मिळवले होते. त्यानंतर तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने हे यश मिळवले आहे. हे यश संपूर्ण कोल्हापूरवासीयांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

 स्वप्नील ला 2021 साली 'ब्रँड कोल्हापूर' हा सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. 'ब्रँड कोल्हापूर'च्या या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा खेळाडूंचा गौरव केला जातो. 'ब्रँड कोल्हापूर'ने गौरवलेल्या स्वप्नीलने मिळवलेल्या या यशाचा अभिमान वाटत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.