गार्डन्स क्लब कोल्हापूर तर्फे 640 रोपांची लागवड
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गार्डन्स क्लब च्या वृक्षारोपण सप्ताहाची सुरुवात डॉ श्रुती कुल्लोल्ली याच्या हस्ते टेम्बालाई परिसरात शमीचे रोप लावून झाली. क्लब च्या सल्लागार समिती सभासद व तरुण उद्योजिका जिया झंवर यांच्या तत्पर व मोलाच्या मदतीने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
पहिल्या दिवशी क्लब मेंबर्स बरोबरच डॉ डी वाय पाटील स्कुल ऑफ आर्किटेक्चरचे 50 विद्यार्थी आणि स्टाफ यांच्याकडून 110 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
परितोष उरकुडे, वसुंधरा नर्सरी चे बागेवाडी दाम्पत्य, यांचा सहकार्याबद्दल रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. सुंदरी नावाचं खारफुटी चं दुर्मिळ रोप डॉ निरंजना चव्हाण यांनी भेट दिले. डॉ डी वाय पाटील कॉलेज च्या आर्की निला जिरगे , आर्की इंद्रजीत जाधव, तसेच डॉ संपतकुमार, श्री ढवळे , डॉ निरंजना यांचा हि सन्मान करण्यात आला. वरूण राजाला साकडं घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ धनश्री पाटील, पारितोष उरकुडे यांनी रोप कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले, व कॉलेज च्या मुलांनी त्यानंतर सर्व सूत्रे हातात घेऊन उत्स्फूर्तपणे, गाणी गात आपले श्रमदान दिले. यासाठी इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुंदर माहिती , फोटो आणि विडिओ सह माहिती डॉ प्रमिला आणि डॉ निरंजना यांनी सर्वांसाठी उपलब्ध करून दिली.
दुसऱ्या दिवशी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात डेक्कन कॉलेज ऑफ इंटिरियर design चे विद्यार्थी, स्टाफ, ट्रस्टी सुभाष कुलकर्णी, निरंजन वायचळ, आर्की सीमा मालाणी व गार्डन्स क्लब चे सभासद उपस्थित होते व 87 झाडे लावण्यात आली.
वृक्षारोपणाच्या तिसऱ्या दिवशी कलाप्रबोधिनी इन्स्टिटयूट ऑफ डिझाईन मधील विद्यार्थी,स्टाफ , आर्की दीपाली दामुगडे,भूषण सर, आर्की शिवराज घाटगे यांच्या मदतीने 150 झाडे लावण्यात आली.
चौथ्या दिवशी , कोल्हापूर पब्लिक स्कूल च्या मुलांचा चिवचिवाट, देशभक्तीपर गीतांचे समूहगान , न्यू कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या आर्की मनोरमा पाटील, वंदना पुसाळकर, सरोज पारिजातआणि सरोजिनी फार्मासि च्या शोभा तावडे, तांबोळी ,व कॉलेज च्या तरुणाई चा जोश या टीम ने 120 झाडे लावली व पुढील दोन दिवसात टोटल 530 झाडांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी वाघजाई च्या डोंगरावर , मंदिरापर्यंत पायऱ्या आहेत त्याच्या दोन्ही बाजूला अभय कोटणीस, कृपेश हिरेमठ, कल्पना थोरात , डॉ माळी यांच्या हस्ते 110 झाडे लावण्यात आली. ज्योतीराम पाटील व गावातल्या मुलांची मोलाची मदत झाली.
गार्डन्स क्लब च्या अध्यक्षा पल्लवी कुलनाश शिरगावकर,सचिव सुप्रिया भस्मे, कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे , शैला निकम, सुनेत्रा ढवळे , डॉ रचना संपतकुमार, रेणुका वाधवानी , charuta शिंदे, रोहिणी पाटील, जयश्री कजारिया , संगीता कोकितकर, रवींद्र कुलकर्णी, इंद्रजीत महाजन, डॉ अंजली साळवी वेद , तपन , तन्मय , निहारिका , उपस्थित होते.