HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा : ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा : ॲड.उज्वल निकम

हातकणंगले (प्रतिनिधी) :  कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची आव्हाने पार करता येतात.उमेद,जिद्द,विश्वास असणारी व्यक्ती कधीच हारत नाही. प्रतिकूल परिस्थितीची झुंज देता यायला हवे तरच आई-वडिलांची इच्छा पूर्ण करता येते असे प्रतिपादन पद्मश्री,सरकारी वकील,ॲड.उज्वल निकम यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठात 26 ऑगस्ट रोजी झालेल्या लाॅ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

      पुढे ते म्हणाले,समाजात वकिलांना जंटलमेन म्हणून ओळखले जाते. तो लॉजिकल थिंकिंग करत असतो. चांगलं काय आणि वाईट काय याचं वर्गीकरण करत असतो हे कौशल्य आपल्यात निर्माण होण्यासाठी लॉ चे शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी सायबर लॉ,इंडस्ट्री लॉ अशा विशेष शाखांवर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावे.

    यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधीर कुलकर्णी उपस्थित होते. 1991 पासून या भागातील विकासाचा साक्षीदार असल्याचे सांगताना त्यांनी संजय घोडावत यांनी माळरानावर फुलवलेल्या शैक्षणिक नंदनवनाचे कौतुक केले. कायद्याचे शिक्षण देणारे स्कूल या कार्यक्षेत्रात निर्माण होत असल्याचा आनंद आहे. समाजासाठी उत्तम वकील येथून घडावेत अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

        चेअरमन संजय घोडावत यांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी त्यांनी उपस्थित विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे आणि लॉ विभागाच्या संचालिका ॲड. डॉ.अंजली पाटील यांनी हा विभाग सुरू करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे कौतुक केले.

       यावेळी कोल्हापूर जिल्हा बारा असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सर्जेराव खोत, उपाध्यक्ष ॲड. उमेश मनगावे,सचिव ॲड. निशिकांत पाटोळे, महिला प्रतिनिधी ॲड. सोनाली शेठ उपस्थित होत्या. तसेच सर्व डीन,प्राध्यापक, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहन तिवडे यांनी केले तर सर्वांचे आभार ॲड. डॉ.अंजली पाटील यांनी मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.