आज उपमुख्यमंत्री विशाळगडावर जाणार

आज उपमुख्यमंत्री विशाळगडावर जाणार

कोल्हापूर (प्रतिनिधि) : रविवारी विशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेकांचे संसार उध्वस्त झालेत. विशाळगडावर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दगडफेक, जाळपोळ, तोडफोड या पार्श्वभूमीवर गडावरील वातावरण तणावपूर्ण झाले होते. विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण हटविण्यासाठी गेले काही दिवस आंदोलनाचा इशारा दिला जात होता. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे संभाजीराजे यांनी 'चलो विशाळगड' चा नारा दिला. मात्र, विशाळगडावर अज्ञातांनी जोरदार दगडफेक केली. अतिक्रमण केलेल्या दुकानांची मोडतोड आणि तोडफोड करण्यात आली. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.

विशाळगडापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि विशाळगड आक्रमणाशी कोणताही  संबंध नसलेल्या गजापूर या गावच्या, निष्पाप जनतेच्या घराची लूट करण्यात आली वाहनांची नुकसान, घराची जाळपोळ,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आलं. तसेच मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळावर देखील हल्ला करण्यात आला. यासाठी विशाळगडावरील  स्थानिकांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी विशाळगडावर जाणार आहेत.  यावेळी ते राज्य सरकारतर्फे सर्व नुकसानाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आलीय.