सुधाकर भालेरावांचा भाजपाला धक्का:लवकरच या पक्षात करणार प्रवेश
मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत. यामध्येच भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
सुधाकर भालेराव हे भाजपातील महत्त्वाचे नेते असून, त्यांनी पक्षाच्या विविध कार्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे.भालेराव यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. असे समजते की ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.राजकीय तज्ञांच्या मते, सुधाकर भालेराव यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात.त्यांच्या या निर्णयामुळे भाजपाच्या आगामी निवडणुकीतील योजनांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.