ऊर्जा क्षेत्रात संशोधन गरजेचे : डॉ. जी. डी. यादव

अतिग्रे: जागतिक आणि भारतातील पारंपारिक ऊर्जा स्त्रोत 2050 पर्यंत संपण्याच्या मार्गावर असतील त्यामुळे अनेक देशांपुढे ऊर्जा शी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागेल त्यामुळे येणाऱ्या कळत ऊर्जा क्षेत्रात संशोधनाला संधी असल्याचे मत नॅशनल सायन्स चेअर (भारत सरकार) व माजी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे, पद्मश्री डॉ. जी डी. यादव यांनी मांडले.
संजय घोडावत विद्यापीठाच्या 1 मार्च रोजी झालेल्या सहाव्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.यादव बोलत होते. त्यांनी पर्यावरणीय बदल, जागतिक तापमान वाढ, नवीन ऊर्जेचे स्रोत, ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने, जगासमोरील व भारतासमोरील यासंबंधीत आव्हाने, कार्बन उत्सर्जन व ऊर्जा क्षेत्रातील संशोधन या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. तसेच सरकारने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इंटर्नशिप अनिवार्य करावे, त्यासाठी पाच हजार रुपये स्टायपेंड व मुलींचे शिक्षण फ्री असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ऊर्जा क्षेत्रात विशेष करून पवनचक्की क्षेत्रातील घोडावत ग्रुपने दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्यामध्ये विद्यापीठाने सुरू केलेले नव उपक्रम व त्यांना आलेले यश याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच भविष्यकालीन योजना बद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता शिस्त, मेहनत आणि इमानदारीच्या मार्गावर चालल्यास यश निश्चित मिळते, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी 908 पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली. आचार्य 108 श्री विशुद्ध सागर जी महाराज मुंबईत असल्यामुळे त्यांना देण्यात येणारी डी.लीट पदवी त्यांच्या कार्यक्रम स्थळी जाऊन देण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील यांनी दिली.
यावेळी गव्हर्निंग बॉडीचे सदस्य डॉ. बी. एम. हिर्डेकर, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, सर्व डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील व अर्जुन पाटील यांनी केले.