HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी’ बॅच २०२४ - २०२५ चा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात इंडस्ट्रीमध्ये सेफ्टीचे महत्त्व अधोरेखित केले आणि सेफ्टी ऑफिसरवर असलेल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवण्याचे आवाहन केले. 

इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (ADIS) कोर्सेचे महत्व आणि उपयुक्तता सांगून इंडस्ट्रियल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हा कोर्स उपयुक्त असून आपल्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देणारा आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या ऑन जॉब ट्रेनिंग कार्या विषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी प्रशांत पांचाळ, सात्विक शिंदे, सूत्रसंचालन दिग्विजय कोपर्डेकर, आभार प्रदर्शन ओमकार पाटील यांनी केले. इंडस्ट्रियल सेफ्टी’ ऑफिसर या पदावर काम करणाऱ्या  सर्व विद्यार्थांना संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय  घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक डॉ. विराट गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, संजय घोडावत विद्यापीठाचे,  कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, पॉलिटेक्निक प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, प्रा. सुजित मोहिते, विश्वस्त विनायक भोसले, कोर्सेसचे सर्व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.