एस.टी.महामंडळाच्या सावंतवाडी -बोरिवली एस टी बसला अपघात

एस.टी.महामंडळाच्या  सावंतवाडी -बोरिवली एस टी बसला अपघात

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :- अमित वेंगुर्लेकर 

शुक्रवार दनांक २९\ ०९\२०२३ रोजीची सावंतवाडी बोरिवली एस्टी बस संध्याकाळी ५ ३० वाजता सावंतवाडी आगारातून एकच चालकाची नेमणूक करून पाठवण्यात आली यावेळी सोबत वाहक हा चालक पदावर अनुभवी असा द्यावा अशी पूर्व कल्पना सावंत वाडी आगार व्यवस्थापकांना संबंधित चालकाने देऊन सुद्धा आगार व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने एकाच चालकाची ड्युटी नोंदवली.आज पहाटे साडेपाचच्या सुमारास सदर एस्टी बसच्या चालकाने सतत साडेबारा तास गाडी चालवून अखेर त्याला झोप लागली व तेव्हड्यात गाडीवरील नियंत्रण सुटून पेण जवळील खारपडा टोलनाक्यावर एस्टी बस आदळली टोलनाका बंद असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र प्रवाशांचे हाल झाले.

  असे अनुचित प्रकार घडू शकतात याबाबतची अधिसूचना मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून एस्टी परिवहन महामंडळाच्या प्रशासनास दिली होती परंतु याची पूर्ण दाखल न घेता फक्त चालकासोबत वाहकाची नेमणूक केली गेली एकच चालकाची सतची आठ तासांपेक्षा म्हणजे साडेबारा तास सतत ड्युटी नोंदवली गेल्यामुळे हा अपघात घडला आहे. असे अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून सांगितले आहे.