बजाज फायनान्स कंपनी सावंवाडी शाखे च्या वसुली अधिकाऱ्यांविरोधात तक्रारीत वाढ मानवाधिकार संघटना आक्रमक

बजाज फायनान्स कंपनी सावंवाडी शाखे च्या वसुली अधिकाऱ्यांविरोधात तक्रारीत वाढ   मानवाधिकार संघटना आक्रमक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी अमित वेंगुर्लेकर

बजाज फायनान्स चे संबधित शाखा व्यवस्थापक यांनी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन पदाधिकारी यांना दिले आश्वासन.

सावंतवाडी पाटील कॉम्प्लेक्स येथील बजाज फायनान्स कंपनी मधील वसुली अधीकारी यांच्या मनमानी कारभारामुळे स्थनिक जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.दमदाटी करत शिवीगाळ करून कर्जदाराना अर्वाच्य भाषेत अनुवाद करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.या बाबत काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका कर्जदारांनी आपल्यावर होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी सावंवाडी पोलिस स्टेशन मध्ये बजाज फायनान्स कंपनी सावंवाडी शाखेतील एका वसुली अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.तसाच प्रकार आज पुन्हा घडला.दिनांक 29/042023 रोजी बजाज फायनान्स कंपनी मार्फत मोबाईल नंबर 8828536304 या क्रमांकावरून सावंवाडी शहरातील रहिवासी श्री.श्यामसुंदर दत्तात्रय टोपले यांना बजाज फायनान्स कंपनी मधून फोन आला.त्यांनी ठरलेल्या रकमेमधून 45% रक्कम भरूनही संबंधित वसुली अधिकारी याने आपण पुण्यामधील बजाज शाखेतून बोलतो असे सांगत दमदाटी करून मानसिक त्रास दिला. तसेच कर्जदाराच्या नातेवाइकांना फोन करून फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकारी यांनी अर्वाच्य भाषेत अनुवाद करून मानसिक त्रास दिला त्यामुळे तिला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं.सदरच्या अर्जात तक्रारदार श्री. श्यामसुंदर टोपले यांनी याबाबत लेखी उल्लेख केला आहे,एकूण 26000 रुपयाच्या तडजोडीच्या कर्जात त्यांनी रोख रुपये दहा हजार दिनांक 31/03/2023 रोजी बजाज फायनान्स कंपनी मध्ये स्वतः जावून भरले होते. उर्वरित रक्कम रुपये 16000 करिता काही मुदत मागितली होती,परंतु आज सकाळी वरील मोबाईल क्रमांकावरून श्री टोपले यांना धमकी चे व अर्वाच्य भाषेत बोलनाऱ्या एका महिलेचे फोन आले, या आधीही असे घडले होते त्यामुळे याबाबत श्री. टोपले यांनी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून संबंधित अधिकारी यांच्या कार्यालयातील शाखा व्यवस्थापक यांच्याकडे घडलेल्या घटनांचा लेखी तक्रार अर्ज दाखल केला.सभंदित वसुली अधिकारी यांची योग्य

ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन बजाज फायनान्स कंपनी तर्फे श्री अमित वेंगुर्लेकर प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन यांना दिली आहे.तसेच असा प्रकार पुन्हा होणार नाही असे आश्वासन दिले आहे .