कागलच्या श्रीराम मंदिरमध्ये शनिवारी भारतनाट्यमचे आयोजन

कागल : येथे शनिवारी (ता.५)भक्तीपर गीतांवर आधारित भारतनाट्यम या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.श्री रामनवमी निमित्त श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समितीच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे.
तपस्यासिद्धी स्कूल भरतनाट्यम तसेच प्रतीनंद कला मंदिरचे कलाकारभ रतनाट्यमचे सादरीकरण करणार आहेत.श्रीराम नवमी निमित्त येथे आठवडाभर संतश्रेष्ठ श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांच्या श्रीराम चरित मानस या मराठी ग्रंथावर आधारित प्रवचनकार कांचनताई धनाले यांचे 'रामकथा प्रवचन' सुरू आहे. या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा जीवनपट ओघवत्या शैलीत धनाले यांनी मांडला आहे.
सकाळी दहा ते बारा यादरम्यान उत्तराखंड पारायण समाप्ती होईल तर सायंकाळी सहा ते सात या दरम्यान भरतनाट्यमचा कार्यक्रम होईल.रविवारी (ता.६) दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात येणार आहे.या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.