HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोरे अभियांत्रिकी व आयआयएम बंगळुरू यांच्यात सामंजस्य करार

कोरे अभियांत्रिकी व आयआयएम बंगळुरू यांच्यात सामंजस्य करार

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) वारणानगर, अभियांत्रिकी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) बंगळुरू यांच्यात नुकताच एक महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) झाला आहे. या करारावर कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास व्ही.कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे व आय. आय. एम. बेंगळुरू कडून साईदीप सी.व्ही. रथनम, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मिझुहो इंडिया जपान स्टडी सेंटर यांनी स्वाक्षरी केल्या.

या कराराच्या यशस्वीतेबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

या कराराच्या माध्यमातून व्यवस्थापन, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास, प्राध्यापक सल्लागार, विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, उद्योग जगताला फायदा तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आणि इन्टर्नशिपच्या संधी उपलब्ध होतील. या सामंजस्य करारामुळे तज्ञ मनुष्यबळ तयार होईल व त्यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्रातील इंडस्ट्रीसाठी लीन मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम वापरण्यासाठी मदत होईल.

या कराराबरोबरच मेकॅनिकल विभागातील चार प्राध्यापकांनी, डॉ. महेश जाधव, प्रा. सचिन महाडिक, प्रा. विवेक पाटील आणि प्रा. विश्वजीत पाटील यांनी फाउंडेशन ऑफ लीन मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस या कोर्ससाठी नोंदणी केलेली आहे. 

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विलास व्ही.कारजिन्नी यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, "उद्योग व शिक्षण संस्थांमधील भागीदारीमुळे नवसंशोधनास निश्चितच चालना मिळेल.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.