कागल येथे बुधवारपासून राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन
कागल : येथील कागल नगरपरिषदेच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमाला येत्या बुधवार (दि. २५) पासून सुरू होत असल्याची माहिती मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिली
उद्घाटनासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. बुधवारी (दि. २५) प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव हे "गावाकडे चल माझ्या दोस्ता" या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. गुरुवारी (दि. २६) संजय कळमकर हे "जगण्यातील आनंदाच्या वाटा" या विषयावर, शुक्रवारी (दि. २७) सुदर्शन शिंदे हे "जाणीव शिव शभूच्या बलिदानाची" या ऐतिहासिक विषयावर व्याख्यान देतील, तर शनिवारी (दि. २८) अभिनेते ऋषिकेश जोशी हे "कलाकारांचे अंतरं" या विषयावर, रविवारी आयएएस अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्पर्धा परीक्षा व तयारी यावर बोलतील. रोज सायंकाळी सहा वाजता हिंदुराव घाटगे विद्यामंदिराच्या पटांगणात ही व्याख्यानमाला होणार आहे.