अंतरवाली सराटीत ड्रोन घिरट्या:काय म्हणाले मनोज जरांगे?

अंतरवाली सराटीत  ड्रोन घिरट्या:काय म्हणाले मनोज जरांगे?

जालना (प्रतिनिधी):जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मी समाजाकरिता आरक्षण लढा लढत आहे, ड्रोन फिरत असले तरी मी घाबरणार नाही, माझा लढा सुरूच राहील. कोणाला काय साध्य करायचे आहे हे माहित नाही, पण मी घाबरून माझा आरक्षण लढा व दौरा थांबवणार नाही."

गावकऱ्यांनी दिली पोलिसांना माहिती :

अंतरवाली सराटी गावात चार दिवसांपासून आकाशात ड्रोन फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरपंच कौशल्या तारख यांचे चिरंजीव पांडुरंग तारख आणि ग्रामस्थांनी गोंदी पोलीस स्टेशनला सोमवार, 1 जुलै रोजी रात्री माहिती दिली आहे.