काल सामना जिंकला पण 'या' कॅप्टनला १२ लाखांचा दंड...

काल सामना जिंकला पण 'या' कॅप्टनला १२ लाखांचा दंड...

काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स झालेल्या सामन्यात चेन्नईला नमवून IPL २०२४ च्या हंगामातील पहिला विजय मिळवलाय या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने चांगली खेळी करत चेन्नईची घोडदौड थोडी धीमी केलीये. मागील झालेल्या सामन्यात चेन्नईने सलग २ सामने जिंकले होते, पण चेन्नईचा संघ दिल्लीविरुद्ध कामगिरी करण्यात अपयशी ठरला. दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जचा २० धावांनी पराभव करत सामना जिंकला असला तरी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला सामना संपल्यानंतर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

दिल्ली संघाने शानदार कामगिरी करत विजय तर मिळवला पण हा विजय दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगलाच महागात पडला आहे. कारण विजयानंतर कर्णधार पंतला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला. षटकांची गती न राखल्याबद्दल कारवाई पंतला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याच हंगामात गुजरात जायँट्स संघाचा कर्णधार शुभमन गिललाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला होता. विशेष म्हणजे गिलवरही चेन्नईविरुद्धच्या सामन्यादरम्यान हा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे शुभमन गिल नंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतला देखील स्लो ओव्हर रेटमुळे १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे