किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत मुंबई पोलिसांच्या सूत्रांचा मोठा दावा

किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत मुंबई पोलिसांच्या सूत्रांचा मोठा दावा
किरीट सोमय्यांचा 'तो' व्हिडीओ खरा

माझा महाराष्ट्र / प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. व्हायरल झालेला तो आक्षेपार्ह व्हिडिओ किरीट सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. परंतु, हा आक्षेपार्ह व्हिडिओ कोणी व्हायरल केला याचा तपास अद्याप सुरुच आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप केले होते. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळले आहे. 

किरीट सोमय्या यांच्या या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. अधिवेशनातील गदारोळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.