कोण होणार मंत्री
मुबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपचे १३२ आमदार असल्याने त्यांचेच जास्त मंत्री असतील. शिंदे सरकारमध्ये १०५ भाजपचे आमदार होते तर १० मंत्री होते. यामुळे अनेकांना मंत्री होता आले नाही. यावेळी भाजपचे जास्त आमदार आहेत यामुळे भाजपच्या अनेक आमदारांना मंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत. विधानसभा सभापती आणि प्रदेशाध्यक्षपद कोण होणार याचीहि उसुक्ता सर्वाना आहे. प्रदेश अध्यक्ष पद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे. ते मंत्रपदाचे दावेदार आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झाल्यावर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. किमान तीन वेळा झालेले आमदार मंत्रपदासाठी प्रयत्नशील आहेत. ज्यांनी मंत्री म्हणून काम केलेले आहे त्यांना यावेळी जास्त महत्वाचे खाते हवे आहे. म्हणूनच यावेळी मंत्री पदासाठी इच्छिकांची यादी मोठी आहे. यामुळे कोण होणार मंत्री अशी चर्चा महायुतीत सुरु आहे.