मोठी बातमी! खास.संजय राऊतांना १५ दिवसांची शिक्षा; २५ हजारांचा दंड
मुंबई (वृत्तसंस्था) : माझगाव न्यायालयाने गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याविरोधात मानहानीच्या आरोपांमध्ये दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. याचबरोबर राऊत यांना २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला, जो मेधा यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
मेधा यांनी राऊत यांच्यावर सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामातील घोटाळ्याचे खोटे आरोप केल्यामुळे मानहानीचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने राऊत यांच्यावरच्या आरोपांना सत्य ठरवत, त्यांच्या वक्तव्यामुळे मेधा यांच्या प्रतिष्ठेला हानी झाल्याचे स्पष्ट केले आहे.