HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोरे अभियांत्रिकी येथे सेन्टर ऑफ एक्ससललेन्स इन इलेक्ट्रिक वेहिकल्स केंद्राचे उद्घाटन

कोरे अभियांत्रिकी येथे सेन्टर ऑफ एक्ससललेन्स इन इलेक्ट्रिक वेहिकल्स केंद्राचे उद्घाटन

वारणानगर प्रतिनिधी : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) इंजिनिअरिंग कॉलेज या ई-मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक व्हेईकलमधील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजीन्नी यांच्या हस्ते झाले. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी आमदार डॉ. विनयरावजी कोरे, अध्यक्ष श्री. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूह यांचेकडून विशेष प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले.

या प्रसंगी डॉ. व्ही. व्ही. कारजीन्नी म्हणाले की, ई-मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहनांमधील उत्कृष्टता केंद्र एक अत्याधुनिक सुविधा प्रदान करेल जिथे विद्यार्थी इलेक्ट्रिक सायकल, बाईक विकसित करू शकतील आणि इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान आणि साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील. जागतिक स्पर्धेत, विशेषतः शिक्षण क्षेत्रात प्रवीणता मिळविण्यासाठी, हे एक महत्त्वाचे पाऊल असेल. वाढत्या ईव्ही उद्योगासह, विविध क्षेत्रांमध्ये असंख्य करिअर संधी उदयास येत आहेत. या अभ्यासक्रमासाठी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रोनिक्स विभागातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवली आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह उद्योगात नोकरी मिळण्यास मदत होईल. या प्रमाणित कार्यक्रमात ६ विषय समाविष्ट आहेत जे सध्याच्या परिस्थितीशी संबंधित आहेत.

ही प्रयोगशाळा तयार करण्यासाठी, डॉ. प्रवीण जी. ढवळे, आणि त्यांच्या टीमचे योगदान लाभले, प्रा. मल्लंगौडा एन. आणि त्यांची टीम, डॉ. धनराज पाटील, प्रा. प्रवीण देशमुख, प्रा. विशाल सनदे,  एन. बी. जाधव यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. उद्घाटन दरम्यान डॉ. व्ही. व्ही. कारजीन्नी, डॉ. एस.एम पिसे, मुरली अय्यर, संजीव राजोरिया, डॉ. प्रवीण जी. ढवळे, प्रा. पी.आर.पाटील, प्रस्तावित वारणा विद्यापीठाचे सर्व संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.