कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर ; मा.आ.अमल महाडिक

कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर ; मा.आ.अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी केली होती. या मागणीची दखल घेत या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

या निधीतून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बापू रामनगर ते कळंब्याला जोडणारा रस्ता, कळंबा नरके नगर ते पाचगाव रस्ता, वडकशिवाले ते नागाव रस्ता, इतर जिल्हा मार्ग 76 ते मुडशिंगी गांधीनगर रस्ता, वसगडे सोनार माळ ते नंदीवाले पाणंद रस्ता या रस्त्यांसाठी प्रत्येकी 30 लाख रुपये तर प्रमुख राज्यमार्ग सहा पासून मौजे वडगाव ते राष्ट्रीय महामार्ग चारला जोडणारा रस्ता आणि मेनन फॅक्टरी ते नागाव रस्त्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. 

हे सर्व रस्ते नव्याने करण्यात येणार असून त्यांची रुंदीही वाढवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते नव्याने करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी उचलून धरली होती त्या मागणीला यश येऊन पहिल्या टप्प्यात या सात रस्त्यांची बांधणी नव्याने होणार आहे.

 ग्रामीण भागातील दळणवळणाची समस्या यामुळे सुटणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  महाडिक यांनी संबंधित विभागाचे आभार मानले आहेत. रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होऊन दर्जेदार काम होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.