HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापूर - सांगली राष्ट्रीय महामार्ग NH 166 भूसंपादन प्रक्रियेतील समस्यांबाबत मंत्रालयात बैठक संपन्न ..!

कोल्हापूर - सांगली राष्ट्रीय महामार्ग NH 166 भूसंपादन प्रक्रियेतील समस्यांबाबत मंत्रालयात बैठक संपन्न ..!

मुंबई- कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गातील (क्र.१६६) भूसंपादनाची चोकाक ते अंकली दरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश महसूल मंत्री नाम. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

कोल्हापूर - सांगली राष्ट्रीय मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नव्याने प्रस्ताव द्यावा, तो मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात येईल असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत . यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करुन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा. या रस्त्याला यापूर्वी गुणांक ‘१’ होता तो आता गुणांक ‘२’ करण्यात यावा. ज्यामुळे या मार्गाच्या भूसंपादनातील अडचणी दूर होतील. शासनामार्फत यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. 

या बैठकीला नामदार प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार अशोकराव माने यांच्यासह प्रमुख मान्यवर व महसूलचे अधिकारी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.