गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 55.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 12.8 मिमी, शिरोळ -10.5 मिमी, पन्हाळा- 28.4 मिमी, शाहुवाडी- 33.5 मिमी, राधानगरी- 18.4 मिमी, गगनबावडा- 55.8 मिमी, करवीर- 14.8 मिमी, कागल- 13.9 मिमी, गडहिंग्लज- 11.2 मिमी, भुदरगड- 32.4 मिमी, आजरा- 23.7 मिमी, चंदगड- 37.6 मिमी असा एकूण 21.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.