जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंतापदी मनीष पवार

जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंतापदी मनीष पवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंतापदी मनीष पवार यांची पदोन्नतीने नेमणूक झाली. यापूर्वी त्यांनी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद तसेच इचलकरंजी नगरपालिकेत काम केले आहे. पवार सध्या पुणे येथील जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये उपअभियंतापदी कार्यरत होते. त्यांची येथील रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी नगरपालिका, बारामती, रत्नागिरी या ठिकाणी सेवा बजावली आहे. पवार हे लवकरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कोल्हापूर कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत.