चोरीस गेलेल्या छकडी, ट्रॅक्टर ट्रॉलीचे व्हील व टायरचा 24 तासात छडा राधानगरी पोलिसांची कारवाई

चोरीस गेलेल्या छकडी, ट्रॅक्टर ट्रॉलीचे व्हील व टायरचा 24 तासात छडा  राधानगरी पोलिसांची कारवाई

राधानगरी प्रतिनिधी : निवास हुजरे

राधानगरी पोलीस ठाणे गु.र.न.65/2023 भा.द. वि. स. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे कृष्णात ईश्वरा पाटील रा. येळवडे ता. राधानगरी यांचे दत्तमंदिर येळवडे येथे असलेल्या माळ शेतातील छकडी तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीचे व्हील व टायर अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत तक्रार दिलेवरून वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

  सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपी हे सदर ठिकाणी टाटा सफारी गाडी घेऊन आले होते.सदरची गाडी संशयितरित्या दत्तमंदिर जवळ लावलेली होती अशी माहिती बातमीदारांच्या कडून पोलीस नाईक अरविंद पाटील यांना प्राप्त झालेने सदर गाडीचा शोध घेऊन सदरची गाडी ही सांगरुळ येथील असल्याची माहिती मिळाल्याने त्यावरून सदर गाडीचा व गाडीमालकाचा शोध घेऊन त्यांचेकडून माहिती घेतली असता सदर टाटा सफारी गाडी नं.MH09 बक्स 9360अशी असल्याची माहिती प्राप्त होऊन सदरची गाडी विनायक शिवाजी कुंभार हा घेऊन मेनन अँड मेनन कंपनी विक्रमनगर कोल्हापूर येथे कामावर गेले असल्याची माहिती मिळालेने सदर ठिकाणी जाऊन आरोपीसह सदरची गाडी ताब्यात घेऊन विनायक शिवाजी कुंभार यांच्याकडे चौकशी केली असता सदरची छकडी व ट्रॅक्टर ट्रॉलीचे व्हील व टायर विजय आनंदा कुंभार याने व आपण जाऊन चोरून सफारी गाडीतून आणले असल्याचे सांगितलेने विजय आनंदा कुंभार यास ताब्यात घेतले असून सदरची गाडी आरोपी यांचेसह तपास कामी ताब्यात घेतले आहे.नमूद आरोपी यांना अटक केली असून त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत काय याबाबत तसेच त्यांचे आणखीन कोणी साथीदार आहेत काय याबाबत तपास चालू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडेसो,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई सो,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मंगेश चव्हाणसो,शहर विभाग कोल्हापूर अतिरिक्त कार्यभार शाहूवाडी विभाग,कोल्हापूर तसेच पो. नि.मा. स्वाती गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अरविंद पाटील,पो. हे. कॉ. के. डी.लोकरे,पो. कॉ. गजानन गुरव,पो. कॉ.रोहित खाडे,पो. कॉ.रणधीर वरोटे,चालक पो. ना.कृष्णात साळोखे यांनी केली आहे.