नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनांचे पालन करावे : जिल्हाधिकारी

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
सद्यस्थितीत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. इतर धरणांचा विसर्ग मिळून 7 ते 8 हजार क्युसेक पाणी येत्या 15 तासांत कोल्हापुरात येईल. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढण्याचा अंदाज आहे. अशा परस्थितीत कोल्हापूरकरांनी घाबरून न जाता पाणी येण्याआधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे पुरबाधित भागातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन..
https://youtu.be/qlfCpMIfbx0