जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मिडीयाव्दारे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. 

जिल्ह्यात आता मोठया प्रमाणात यात्रा, उरुस साजरे होतात. या दरम्यान एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून जातीय तेढ निर्माण होवू नये, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 20 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.