भारतीय नौदलात लेफ्टनंटपदी श्रेया देसाईची निवड झाल्याबद्दल खा. शाहू महाराजांनी केले अभिनंदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापुरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावची कन्या श्रेया मिलिंद देसाई हिची भारतीय नौदलात लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे. ही अत्यंत अभिमानास्पद तसेच कौतुकास्पद बाब आहे. निवड झाल्याबद्दल श्रेया देसाई हिचे खासदार शाहू छत्रपती यांनी केले अभिनंदन.
श्रेया हिने कोल्हापूर येथील न्यू पॅलेस परिसरातील, छत्रपती शाहू विद्यालयात शिक्षण घेतले. शाळेत असताना ती Tara Commando Force (TCF) या विशेष सैनिकी प्रशिक्षण योजनेचा सक्रिय भाग होती. ही योजना खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या संकल्पनेतून १९९८ साली सुरू झाली. मुलींना शारीरिक, मानसिक बौद्धिक आणि नैतिक बळ देऊन त्यांना संरक्षण दलांमध्ये सेवेसाठी घडवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
TCF युनिटमध्ये खासदार शाहू छत्रपती महाराज यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व वैयक्तिक सहभाग विद्यार्थिंनींसाठी सतत प्रेरणादायी ठरला आहे. या सशक्त पार्श्वभूमीमुळेच श्रेया देसाई सारख्या विद्यार्थिंनी आज भारतीय सैन्यात जबाबदारीची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.