HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

'ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

'ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शासनाच्या वतीने सन 2019 ते 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 2023 साठी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे 2019, 2020, 2021, 2022 व 2023 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पाच वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारार्थींमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन पत्रकारांचा समावेश आहे.

 कोल्हापूर विभागातून ग. गो. जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2019 साठी दैनिक पुढारीचे पत्रकार एकनाथ नाईक यांना, 2020 साठी दैनिक लोकमतचे पत्रकार भारत चव्हाण यांना तर सन 2023 चा पुरस्कार दैनिक सकाळचे वरिष्ठ बातमीदार शिवाजी यादव यांना जाहीर झाला आहे. 

शासकीय गटातून (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार माहिती व जनसंपर्क) राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक  प्रवीण टाके यांना सन 2019 मधील चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्यासाठी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी वृषाली पाटील यांना सन 2023 मधील कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच 2019 च्या केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कारात कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील तत्कालीन छायाचित्रकार व सध्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापकपदी कार्यरत रोहित कांबळे यांचाही या पुरस्कारात समावेश आहे.

     

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.