डीकेटीई येथे आबासाहेब घोरपडे यांना अभिवादन

इचलकरंजी (प्रतिनिधी) - इचलकरंजीतील आबासाहेब घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
यावेळी उत्तम आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे, डॉ. अशोकराव सौंदत्तीकर, सर्जेराव पाटील, शेखर शहा, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्यासह संचालिका प्रा डॉ. एल. एस. आडमुठे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.