बहुजन समाज पार्टीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे आयोजन

बहुजन समाज पार्टीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृतांच्या माणगाव परिषदेत मंजूर केलेल्या ठरावानुसार राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जयंती बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरूवारी २६ जून रोजी शहरातील प्रमुख चौकात लाडूचे वाटप करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, आयर्विन मल्टीपर्पज हॉल, आयर्विन ख्रिश्चन मैदान या ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. 

राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनकार्य व त्यांचा संदेश देशाच्या काना - कोपऱ्यातील पोहचविण्याचे ऐतिहासिक कार्य बहुजन नायक कांशीराम व बहन मायावती यांच्यासोबतच बहुजन पार्टीने केले आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाजाला व मागासवर्गीय समाजाला आपल्या करवीर संस्थानात ५० टक्के आरक्षण देण्याचा राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी आदेश काढला होता. त्यांचा शताब्दी महोत्सव बहुजन समाज पार्टीने २६ जुलै २००२ रोजी कोल्हापुरात भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरा केला होता. त्याद्वारे समाजाला असा संदेश मिळाला होता की, आपल्या राजावर बहुजन समाजाची नितांत श्रद्धा आहे. नितांत आत्मीयता व जिव्हाळा कायम आहे. तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती महाराष्ट्रभर आणि देशभर पोहचविण्याची नितांत गरज आहे. त्याची अंमलबजावणी बहुजन समाज पार्टी सातत्याने करत आहे. याच अनुषंगाने बहुजन समाज पार्टीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज  यांच्या १५१ व्या जयंती महोत्सवाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले आहे. 

 

या कार्यक्रमासाठी बहुजन समाज पार्टीचे राज्य सभेचे खासदार राजाराम साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. सुनिल डोंगरे, पुणे झोन प्रभारी हुलगेशभाई चलवादी, मुंबई-कोकण झोन प्रभारी किरण अल्हाट, बामसेफ संयोजक शाम पाखरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातून बहुजन समाज पार्टीचे सुमारे दोन हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.