दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि; कोल्हापूरच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी तर उपाध्यक्षापदी पद्मजा मेढे यांची निवड ..!

दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि; कोल्हापूरच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी तर उपाध्यक्षापदी पद्मजा मेढे यांची निवड ..!

कोल्हापूर -  दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि; कोल्हापूर या बँकेची संचालक मंडळाची सभा १५ एप्रिल रोजी बँकेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरिता सी.एम. इंगवले, सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या सभेमध्ये सुरेश कोळी, तालुका करवीर यांचे नाव शिवाजी बोलके यांनी सुचविले तर त्यास नंदकुमार वाईंगडे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षा पदासाठी पद्मजा मेढे, तालुका करवीर यांचे नाव बाळासाहेब निंबाळकर यांनी सुचविले व त्यास अमर वरुटे यांनी अनुमोदन दिले.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अन्य कोणाचीही नामनिर्देशन प्रत्रिका नसल्याने अध्यासी अधिकारी सी. एम. इंगवले यांनी सुरेश कोळी यांची अध्यक्ष तर पद्मजा मेढे यांची उपाध्यक्षापदी बिनविरोध निवड झाली असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष सुरेश कोळी यांनी बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील असं यावेळी कोळी म्हणाले. 

यावेळी सभेस मावळते अध्यक्ष बाळकृष्ण हळदकर, मावळते उपाध्यक्ष रामदास झेंडे, तसेच संचालक बाळासाहेव निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, सुनिल एडके, अर्जुन पाटील, एस.व्ही. पाटील, शिवाजी रोडे-पाटील, नंदकुमार वाईंगडे, अमर वरुटे, शिवाजी बोलके, गौतम वर्धन, गजानन कांबळे, बाबू परीट, वर्षा केनवडे तसेच सुकाणू समितीचे जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, कृष्णात कारंडे, रघुनाथ खोत, बी.एस. पोवार, प्रकाश खोत, संजय कुईकर विविध संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, श्री शाहू आघाडीचे सभासद तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम उपस्थित होते.