'ट्रॅव्हल एजंट'च्या बैठकीत भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा

'ट्रॅव्हल एजंट'च्या बैठकीत भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधि) : ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या मध्य व दक्षिण महाराष्ट्र पुना चाप्टर यांची मेंबर्स बैठक कोल्हापूर येथे पार पडली. या - बैठकीसाठी पुणे चाप्टरचे चेअरमन मेहबूब भाई शेख तसेच सेक्रेटरी याजदी, मार्कर व ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सेंट्रल मॅनेजिंग कमिटीचे बहराम जादह, कोल्हापूरचे अध्यक्ष बळिराम वराडे उपस्थित होते.

बैठकीत ट्रॅव्हल एजंटना भेडसावणारे प्रश्न व भारत सरकारकडून आकारणाऱ्या टीसीएस आणि जीएसटीबद्दलची माहिती आणि त्यामुळे टूरच्या किमतीवर पडणारा फरक याच्याबद्दलचे विवेचन सेंट्रल कमिटीचे पदाधिकारी बहराम यांनी दिले. कोल्हापूरला व्हीएफएस कसा आणता येईल, पर्यटकांचा व्हिसा प्रोसेस कशी सुलभ करता येईल याबद्दलची माहिती सगळ्यांना सांगण्यात आली.

बैठकीस सचिन परदेशी, सुनील लोंढे, भारत थोरात, पवन संचदेवा, सहाबिन रब्बींनी, अमित चौगुले, सचिन सावंत, संजय गांधी, सुनील सन्नके, पवन भाई, विवेक महाजन, सतीश दळवी, नंदिनी खूपेरकर, नवनाथ सुर्वे, तानाजी कलांगे, इर्शाद भाई शेख, पोद्दार उपस्थित होते