शिरोली दुमाला : धरणग्रस्त नवीन वसाहत येथे भीम जयंती उत्सव प्रथमच मोठ्या उत्साहात

शिरोली दुमाला : धरणग्रस्त नवीन वसाहत येथे भीम जयंती उत्सव प्रथमच मोठ्या उत्साहात
शिरोली दुमाला : धरणग्रस्त नवीन वसाहत येथे भीम जयंती उत्सव प्रथमच मोठ्या उत्साहात

वार्ताहर योगेश कांबळे.

शिरोली दुमाला येथील धरणग्रस्त नवीन वसाहत येथे भीम जयंती उत्सव प्रथमच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती संपूर्ण जगभर साजरी दरवर्षी करण्यात येते त्यानुसार याही वर्षी मोठ्या उत्साहात भीमजयंती सर्वत्र पार पाडण्यात आली .

सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांचा विशेष उल्लेख केला जातो अशा महा मानवाची जयंती प्रथमच शिरोली दुमाला ता .करवीर येतील समस्त धरणग्रस्त वसाहत मध्ये तीन दिवस विविध समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी केली. 

सकाळी भीम ज्योतीच्या आगमनानंतर भीम वंदना करण्यात आली नंतर सायंकाळी प्रथम दिनी लहान मुलांना भीम गीतातून बाबासाहेब आंबेडकर यांचा प्राथमिक परिचय व्हावा व त्यांचे विचार रुजावेत म्हणून भिमगीत डान्स आयोजित करण्यात आले होते. त्याच प्रमाणे दुसऱ्या दिनी समस्त समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा कृतीशिल विचार मांडण्यासाठी ऐसे कैसे झाले भोंदू हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला व शेवट तिसऱ्या दिवशी भीम गीतांचा बुद्ध भीम वंदना हा समाज प्रबोधन करणारा व त्यातून माणगाव परिषद प्रकट करणारा जागरण कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. यावेळी समाजातील व भागातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.