HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील व व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड

गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील व व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड

 कोल्‍हापूर  प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सह. दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.,कोल्हापूर या संस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन महादेव पाटील शिरोली दु. यांची तर व्हा.चेअरमनपदी पांडुरंग राजाराम कापसे मल्हारपेठ सावर्डे यांची बिनविरोध निवड श्री.यु.एस.उलपे कार्यालय अधिक्षक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षेतेखाली संस्थेच्या राजारामपुरी येथील प्रधान कार्यालय येथे झाली.

          यावेळी बोलताना नूतन चेअरमन सचिन पाटील म्हणाले कि, गोकुळ कर्मचारी पत संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असून भविष्यात सहकाराच्या माध्यमातून व सभासदाच्या हिताचे निर्णय घेतले जातील. तसेच आधुनिक सेवा सुविधा सभासदाना देणार असून कर्ज मर्यादा १० लाख वरून १२ लाख रुपये करणार असल्याचे सांगितले. तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्यामुळे हि निवड झाली असल्याचे मनोगत व्यक्त केले.

          यावेळी नूतन चेअरमन सचिन पाटील यांचा सत्कार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व व्हा.चेअरमन पांडुरंग कापसे यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच तज्ञ संचालकपदी अशोक पुणेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा हि सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पदाधिकारी यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्‍ठ संचालक विश्वासराव पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील तसेच पतसंस्थेचे संचालक राजेंद्र चौगले, जयदिप आमते, गोविंद पाटील, रामचंद्र पाटील, तुकाराम शिंगटे, सुनिल वाडकर, संदेश भोपळे, सतिश पोवार, दत्तात्रय डवरी, संचालिका माधुरी बसवर, गिता उत्तुरकर, निवडणूक निर्णय अधिकारी यु.एस.उलपे, कर्मचारी पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.