रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष स्मृतिशेष प्रा. विश्वासराव देशमुख यांची उद्या जयंती. रिपाइं च्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन.......

रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष स्मृतिशेष प्रा.  विश्वासराव देशमुख यांची उद्या जयंती.    रिपाइं च्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन.......

दलित मित्र प्रा. विश्वासराव गुंडू देशमुख (हासूरकर) यांच्या 65 वी जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत याचा आम्हा सर्व कार्यकर्ते यांच्या मनाला हर्ष व उभारी मिळत आहे .त्यांनी आपले जीवन कार्य समाजसेवेसाठी प्रामाणिकपणे खर्ची केले. त्यांनी छ.शिवाजी महाराज, म. फुले, रा. शाहू महाराज, घटणेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर. या सर्व थोर नेत्यांना आर्दश मानत आपले आयुष्य व्यतीत केले. समाजसेवेसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. समाजातील विविध प्रश्नांनांना त्यानी न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. म्हणूनच त्यांना " *दलित मित्र* " या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने सन्मानीत केले आहे.त्यांना समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या सदभावनेतुन त्यांनी डोंगराळ भागात मुलींसाठी शाळा व्हावी म्हणून कसबा तारळे येथे हायस्कूल चे वर्चस्व नेहमीच अबाधित ठेवले.त्या शाळेची धुरा संस्थापक , चेअरमन पद संभाळून एक समाजाला एक आर्दश निर्माण करून दिला आहे.अशा कितीतरी त्यांनी समाजसुधारकांना केल्या आहेत.गोरगरीबांना त्यांनी नेहमीच न्याय मिळवून दिला . म्हणूनच त्यांचे कार्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजरामर आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आपण 20 जून 2023 सर्व जण अभिवादन करण्यासाठी हजर रहावे.